[दबावाखाली लस घेतल्यामुळे मृत्यू] सीरम इन्स्टिटयूट चे अदार पुनावाला, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे विरुद्ध हत्या, हत्येची पूर्वतयारी, शासकीय निधीचा दुरुपयोग , भ्रष्टाचार आदी गंभीर गुन्हे केल्याची केस दाखल.
२३ वर्षीय मृत युवकाच्या आईने दाखल केली तक्रार. डॉ. स्नेहल लुणावत यांचा मृत्यू सुद्धा ‘ कोव्हीशील्ड ’ ची लस घेतल्याच्या दुष्परिणामामुळेच झाल्याचे भारत सरकार कडून मान्य. प्रकरणाचा तपास सी. बी. आय. कडे देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका. मुंबई पालिका आयुक्त इकबाल चहल , सह आयुक्त सुरेश काकाणी व इतर अधिकारी सहआरोपी. विविध वकील संघ , मानवाधिकार व सामाजिक सघटनांकडून मृत युवकाच्या आईला पाठीं बा . आरोपींच्या अटकेसाठी देशभर जनआंदोलन करण्याच्या अव्हेकन इंडिया मुव्हमेंट व इंडियन बार असोसिएशनचा इशारा. मुंबई:- लस घेणे बंधनकारक नसल्याचा स्पष्ट नियम केन्द्र सरकारने लागू केला असून लस घेतलेल्या लोकांना सुद्धा कोरोना होत आहे व लसवंत लोक कोरोनाने मरत सुद्धा आहेत. नवीन निष्कर्षातून असेही सिद्ध झाले आहे की रुग्णालयात येणाऱ्या नवीन रुग्णांमध्ये व मरण पावणाऱ्यांमध्ये लस घेतलेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या शिवाय लसीच्या दुष्परिणामांमुळे हजारो लोकांचे मृत्यू झाले आहेत व रोज होत आहेत. लसीकरण झालेल्या लोकांना कमी वयात हृदयविकारा ने मृत्यू होण्याच्या केसेसमध्ये तर लक्षणीय वाढ झाली आहे. लस घेतलेल्...