कोर्ट अवमानना व फौजदारी कारवाईच्या याचिके नंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांचा तो कार्यभार मुख्य न्यायाधीशांनी काढला.
इंडियन बार असोसिएशन व मानव अ धिकार सुरक्षा परिषदेतर्फे मुख्य न्यायाधीशांच्या निर्णयाचे स्वागत . पुढील आवश्यक कारवाई त्वरित होण्याची अपेक्षा . न्यायमूर्ती डेरे यांची बहीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खासदार असल्यामुळे त्या पक्षाच्या केसेस घेण्यास न्यायमूर्ती डेरे अपात्र ठरतात असा स्पष्ट कायदा सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिला आहे. तरीसुद्धा न्यायमूर्ती डेरे यांनी त्या कायद्याचे उल्लंघन करून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ , आमदार दिलीप मोहिते पाटील आदी अनेक प्रकरणाची सुनावणी घेऊन बेकायदेशीरपणे व नियमबाह्य पद्धतीने गंभीर गुन्ह्यांमध्ये त्या आरोपींना मदत होईल असे बेकायदेशीर आदेश पारित करून सुप्रीम कोर्टाची अवमानना केली आहे अश्या आशयाची कोर्ट अवमानना याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. प्रसिद्ध मानवअधिकार कार्यकर्ते श्री. रशीद खान पठाण यांनी ती याचिका दाखल केली आहे. [Rashid Khan Pathan Vs. Revati Mohite Dere & Ors., Diary No. 12076 of 2023] दैनिक सहासिक मध्ये याबाबत बातमी दिनांक 11.03.2023 रोजी प्रकाशित करण्यात आली होती . लिंक ...