[महत्वाचे] न्या. धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश पदासाठी अपात्र याचिकाकर्त्याने पुराव्यासहित याचिका दाखल करून त्यांची नियुक्ती रद्द करण्याची केली मागणी
न्या . चंद्रचूड यांनी केलेल्या 13 गुन्हयांच्या पुराव्यासह 720 पानी याचिका . न्या . चंद्रचूड यांच्याविरुद्ध कोर्ट अवमानना आणी फौजदारी कारवाईची मागणी . न्या . चंद्रचूड यांनी एकाच प्रकरणात श्रीमंत पक्षकार व वरिष्ठ वकिलांना त्यांच्या फायद्याचे आदेश व गरीब पक्षकार आणी ज्युनीअर वकिलांना भेदभावपूर्ण वागणूक देवून वेगळे आदेश देवून त्यांची याचिका नाकारल्याचे धक्कादायक पुरावे याचिकाकर्त्याकडून दाखल . इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राईट्स ॲक्टिविस्टस असोसिएशनचे एम . ए . शेख यांनी दाखल केली याचिका . सुप्रीम कोर्ट चे प्रसिद्ध वकिल ॲड . आनंद जोंधळे हे प्रकरणात युक्तिवाद करणार अजून त्यांना सहाय्यक म्हणून इंडियन लॉयर्स असोसिएशन चे जवळपास ७० वकिलांची फौज राहणार आहे . न्या . चंद्रचूड यांच्याकडून पिडीतांना पक्षपातपूर्ण वागणूक देवून त्यांच्या मुलभूत अधिकारांचे हनन न रोकता उलट स्वतः नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन केल्याचे 13 केसमधील पुरावे सादर . सुप्रीम कोर्टच्या संवैधानिक पीठाने दिलेल्या आद...