संजय राऊतांचे न्यायव्यवस्थेविरोधातील आरोपांवर ठाम असल्याबाबतच्या वक्तव्यावर ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा देण्याची मागणी. उच्च न्यायालयात अतीरीक्त शपथपत्र दाखल.
संजय राऊतांचे न्यायव्यवस्थेविरोधातील आरोपांवर ठाम असल्याबाबतच्या वक्तव्यावर ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा देण्याची मागणी . उच्च न्यायालयात अतीरीक्त शपथपत्र दाखल . मुंबई :- उच्च न्यायालयातील न्यायाधीशांविरुद्ध दिलासा घोटाळ्याचे आरोप करणारे संजय राऊत व इतर यांच्याविरोधात इंडियन बार असोसिएशनने कोर्ट अवमानना याचिका दि . 19.04.2022 रोजी दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी ते त्यांच्या आरोपावर ठाम असून हा ' दिलासा घोटाळाच ' असल्याचे वृत्त वाहिन्यांना दि . 20.04.2022 रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते . लिंक : https://www.youtube.com/watch?v=DuhlmK0AJQU त्याशिवाय त्यांनी न्यायव्यवस्थे विरुद्ध अनेक घृणास्पद व अवमानकारक भाष्य केले आहेत दि 20.04.2022 रोजी एका वृत्तपत्राने त्यांचे एक वाक्य प्रकाशीत केले आहे . “ भाजपचे नेत किरीट सोमय्या , नारायणराणे , नितेशराणे , प्रविणदरेकर , अनिल बोंडे आदींना त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरुन न्यायालयाने जामिन देत त्यांना दिलासा दिलाआहे . त्यावर राऊतांनी न्यायव्यवस्थेवर संशय व्यक्त करुन गंभीर आरोपकेले . न्यायव्यस्थचा ...