संजय राऊतांचे न्यायव्यवस्थेविरोधातील आरोपांवर ठाम असल्याबाबतच्या वक्तव्यावर ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा देण्याची मागणी. उच्च न्यायालयात अतीरीक्त शपथपत्र दाखल.
संजय
राऊतांचे न्यायव्यवस्थेविरोधातील आरोपांवर ठाम असल्याबाबतच्या वक्तव्यावर ६ महिने
तुरुंगवासाची शिक्षा देण्याची मागणी.
उच्च न्यायालयात अतीरीक्त शपथपत्र दाखल.
मुंबई:-
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांविरुद्ध दिलासा घोटाळ्याचे आरोप करणारे संजय राऊत व
इतर यांच्याविरोधात इंडियन बार असोसिएशनने कोर्ट अवमानना याचिका दि.
19.04.2022 रोजी दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी ते
त्यांच्या आरोपावर ठाम असून हा 'दिलासा
घोटाळाच' असल्याचे
वृत्त वाहिन्यांना दि. 20.04.2022 रोजी
दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.
लिंक: https://www.youtube.com/watch?v=DuhlmK0AJQU
त्याशिवाय
त्यांनी न्यायव्यवस्थे विरुद्ध अनेक घृणास्पद व अवमानकारक भाष्य केले आहेत दि 20.04.2022
रोजी एका वृत्तपत्राने त्यांचे एक वाक्य प्रकाशीत केले आहे.
“भाजपचे नेत किरीट सोमय्या, नारायणराणे, नितेशराणे, प्रविणदरेकर,अनिल बोंडे आदींना त्यांच्यावर दाखल
झालेल्या गुन्ह्यावरुन न्यायालयाने जामिन
देत त्यांना दिलासा दिलाआहे. त्यावर राऊतांनी न्यायव्यवस्थेवर संशय व्यक्त करुन गंभीर आरोपकेले.न्यायव्यस्थचा तराजू हा भंगारमधून घेतला असल्याची टीकाही राऊतांनी केली होती.”
त्या दोन्ही गोष्टींचा आधार घेत याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात अतीरीक्त शपथपत्र दाखल करून संजय राऊत यांना घोर अवमानना (aggravated contempt) अंतर्गत सहा महिने तुरुंगवासाच्या शिक्षेची मागणी केली आहे.
अश्याच एका प्रकरणात न्यायाधीश सी एस कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सात महिने तुरुंगवासाची शिक्षा दिल्याबाबतच्या कायद्याचाही आधार अतीरीक्त शपथपत्रामध्ये घेण्यात आला आहे [In Re: C.S. Karnan (2017) 7 SCC 1].
इंडियन
बार असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष अॅड इश्वरलाल अगरवाल यांचे शपथपत्र खालील लिंक
वर उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment