[अति-महत्वाचे] विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी लसीची सक्ती नाही.
लसीचे जीवघेणे व इतर सर्व दुष्परिणाम सांगून पालकांची संमती घेवूनच विद्यार्थ्यांना लस द्या. अन्यथा लस देवू नका. शिक्षण उपसंचालक दिपक चवणे यांचे आदेश. अव्हेकन इंडिया मूव्हमेंटच्या पाठपुराव्यामुळे राज्यभरातील विद्यार्थांना दिलासा अव्हेकन इंडिया मूव्हमेंट ( AIM) आणि इंडियन बार असोसिएशन ( IBA) च्या प्रयत्नांना यश. पुणे :- कोरोना लसीमुळे विद्यार्थांना जीवघेणे दुष्परिणाम होत असताना व त्याची माहिती लस देण्याआधी सांगणे हे संबंधीत अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे . परंतू अशी माहिती न देता तसेच शासनातर्फे लस देणे बंधनकारक नसताना सुद्धा काही शाळांकडून व शिक्षण विभागांशी संबंधित काही अधिकाऱ्यांतर्फे परीक्षेला बसण्यासाठी लसीची सक्ती करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी अव्हेकन इंडिया मूव्हमेंट ( AIM) ला राज्यभरातून प्राप्त झाल्या होत्या. त्यासंदर्भात अव्हेकन इंडिया मूव्हमेंट ( AIM) चे पुणे येथील डॉक्टर सचिन पेठकर सह प्रतिनिधी मंडळाने शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन सर्व कायदेशीर कागदपत्रे ‘इंडियन बार असोसिएशन’ ची नोटीस आणि उच्च , सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे देऊन सर्व गैरप्रकार त्वरित ...